♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे स्वर्गीय संघर्षयोद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्य अभिवादन व प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडलाच्या वतीने लासलगाव मंडल उपाध्यक्ष रवींद्रजी होळकर यांच्या नेतृत्वात मंडल अध्यक्ष निलेशजी सालकाडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय संघर्षयोद्धा आदरणीय गोपीनाथ जी मुंडे यांच्या जयंती निमित्य अभिवादन व प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न.

लासलगाव शहर अध्यक्ष शेखर होळकर जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा स्मिता ताई कुलकर्णी डॉ विलास जी कांगने जेष्ट नेते योगेश पाटील दतुलालजी शर्मा यांच्या मार्गदर्शनात सदरील कार्यक्रम पार पडला मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर प्रमूख अतिथी डॉ कांगने विशालजी पालवे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली.

डॉ विलास कांगने यांनी गोपीनाथजी यांचा भाजपा साठीची पक्ष बांधणी प्रवास, आज त्याची खऱ्या अर्थाने समाजाला असणारी गरज व त्यांचे आदर्श घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे आजच्या सामूहिक कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दिलेल्या सन्मानासाठी धन्यवाद व्यक्त केले.

 

ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा भाजपा नाशिक जिल्हासरचिटणीस महिला मोर्चा स्मिता ताई कुलकर्णी यांनी अमोघ वक्तृत्व अद्वितीय लोकनेता एक समर्पित संघर्ष योद्धा अश्या शब्दात गोपिनाथ जी यांना आदरांजली समर्पित केली.

मूठभर कार्यकर्ते पेरून, असंख्य नेते पिकवण्यासाठी काबाड कष्ट करणारा, तसेच देशभर उपेक्षितांचा आवाज व स्वाभिमान जिवंत ठेवणारा दुहेरी हाडाचा नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याची गरज असे मनोगत व्यक्त केले तसेच मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर यांनी माहित नाही कुणाचा जन्म कुणास काय देऊन गेला हा लोकनेता आम्हाला आमची ओळख देऊन गेला असे अभिवादन व्यक्त करत उपस्थित सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमास प्रमुख सन्मामानिय जिल्हा मंडल प्रत्येक आघाडी अध्यक्ष उपस्थित होते यावेळी उदयोग आघाडी मंडल अध्यक्ष नितिन शर्मा सरचिटणीस निलेश जगताप उपाध्यक्ष टाकळी सोमनाथ गांगुर्डे भोलदादा पवार प्रकाश खलसे पिंपळगाव नजीक दीपक कुलकर्णी संतोष पवार पाचोरा उत्तम नागरे ब्राह्मण गाव गणेश फड बाळासाहेब होळकर मयूर वाघचौरे,पांडुरंग जोंधळे, आनंद टुपके,आण्णा मासळे, व परिसरातील बांधव उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles