♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पलायन करणाऱ्या चोरट्यास धाडसी दुचाकीस्वाराने ….

जनहित न्यूज नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

नासिक गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पलायन करणाऱ्या चोरट्यास धाडसी दुचाकीस्वाराने पाठलाग करीत पकडले.


किरण शिवाजी ताडगे असे धाडसी दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते धाडसी युवकांचा सन्मान करण्यात आला.
मयुर वसंत गायकवाड (वय-३३, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर), पप्पु चंद्रबली चव्हाण (वय-४१, रा. श्रमिकनगर, सातपूर) अशी सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. गेल्या गुरुवारी (ता.७) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास माधुरी गणेश जाधव (रा. महिरावणी, त्र्यंबकरोड) या आकाशवाणी टॉवर परिसराजवळील भाजी मार्केट परिसरातून पायी जात होत्या.
त्यावेळी बुलेटवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी माधुरी यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याची पोत ओरबाडून नेली. माधुरी यांनी आरडाओरड केली असता, किरण ताडगे (रा. मखमलाबाद) यांनी प्रसंगावधान राखत दुचाकीने संशयित चोरट्यांचा पाठलाग करीत त्यांच्या दुचाकीस अडवून दोघांना खाली पाडले
त्यावेळी गर्दी झाल्याने एक संशयिताने पोबारा केला तर, ताडगे यांनी एकाला पकडले. ताडगे यांचा मित्र निलेश बिरारी यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, त्याचवेळी दुचाकी चोरीचा तपास करत असलेले पोलिस अंमलदार सोनु खाडे हे गर्दी दिसल्याने चौकशीसाठी थांबले. त्यावेळी त्यांनी चोरट्यास ताब्यात घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तपास करीत दुसऱ्या संशयितालाही पकडले.
दोघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार व सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक असे एकूण पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे १२१ ग्रॅम वजनाचे सोने व गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी असा एकूण ७ लाख २१ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांनी जबरी चोरीतील दागिने शिवाजीनगर येथील एस. के. ज्वेलर्स दुकान मालक मनोहर बाबुराव कुमावत यास विक्री केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
पोलीस आयुक्तांकडून सन्मान पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून किरण ताडगे व निलेश बिरारी या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. सदर कामगिरी ही गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एन. व्ही. पवार, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, अंमलदार रवींद्र मोहिते, गिरीष महाले, गणेश रेहरे, मिलींदसिंग परदेशी, तुषार मंडले आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles