♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघात जनसुविधांची २ कोटी ५६ लाखांची विविध विकास कामे मंजूर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

 राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी अनुदान योजनेसाठी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जनसुविधांची २ कोटी ५६ लाखांची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहे.

यामध्ये ग्रामपंचायत इमारत, गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ते, सौर पथदीप बसविणे, स्मशानभूमी शेड, स्मशानभूमी घाट, दशक्रिया विधी शेड यासह अनुषंगिक कामांचा समावेश आहे.

यामध्ये येवला तालुक्यातील देवरगांव येथे दशक्रिया विधी घाट बांधण्यासाठी, अंगणगांव येथे सौर पथदीप बसविणे, एरंडगांव खु येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे, सावरगांव (मोठामळा) येथे दशक्रिया विधी शेड बांधण्यासाठी, सोमठाण जोश स्मशानभूमी बैठक शेड करण्यासाठी, आडगांव रेपाळ येथे स्मशानभूमी घाट बांधण्यासाठी, सत्यगांव येथे दशक्रिया विधी शेड करण्यासाठी प्रत्येकी १० लाख, मुखेड येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी २० लाख, चिचोंडी बु येथे स्मशानभूमी सुधारणा व संरक्षक भिंत बांधण्यासाठी, चांदगांव येथे स्मशानभूमी सुधारणा व संरक्षक भिंत बांधण्यासाठी, नायगव्हाण येथे दशक्रिया विधी शेड तयार करण्यासाठी, नांदूर येथे दशक्रिया विधी शेड करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख, तर ग्रा.पं.आहेरवाडी अंतर्गत लहवित येथे स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता करण्यासाठी ७ लाख असा एकूण १ कोटी ५७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.


निफाड तालुक्यातील वनसगांव, टाकळी विंचूर येथे दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व अनुषंगिक करण्यासाठी, मानोरी खु येथे नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख, नांदगांव येथे स्मशानभूमी सुविधा करण्यासाठी, दिंडोरी तास येथे स्टोर वस्ती स्मशानभूमी सुविधा करण्यासाठी प्रत्येकी १० लाख, दिंडोरी तास, शिरवाडे वाकद येथे स्मशानभुमी अनुषंगिक कामे करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख, विंचूर येथे दशक्रिया विधी परिसर कॉक्रिटीकरण करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी २० लाख असा एकूण ९९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles