♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील संस्कार इंग्लिश मेडियम  शाळेत वार्षिक स्नेहसमेलन निमित्त विविध कार्यक्रम

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

संस्कार इंग्लिश मेडियम  शाळेत वार्षिक स्नेहसमेलना निमित्त आनंदनगरी, वार्षिक स्नेहसंमेलन, पालक दिन, वेशभूषा, नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या संचालिका सौ मनीषा होळकर, सौ नंदा डमरे, सौ रश्मी दगडे तसेच युवा नेते निरंजन होळकर होते.

गणपतीच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, दिल तो बच्चा है जी, सोशल मेडिया, टम टम इत्यादी विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

विद्यार्थ्यांनी विविध कला व गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली.
शाळेच्या प्राचार्य अश्विनी कुशारे यांनी, शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला तर इयत्ता 7 वी ची विद्यार्थीनी अनुष्का ढोकळे हिने, शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. इयत्ता 8 वी ची शारिया शेख हिने, स्त्रीयांच्या व्यथा सांगणारी स्वयंरचित कविता सादर केली व सर्व प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली.

दिपाली नाईक, सारिका पाटील यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली तर मनीषा अभंग यांनी, आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी मंगला कदम, सुरेखा भावसार, शबाना काद्री, अझरुद्दीन शेख, शिरीन शेख, अनुश्री कदम, रोहिणी बोरसे, किशन बत्तीसे, प्रमिला रायते, सविता दरेकर, शुभांगी जाधव, इत्यादी शिक्षक वर्गांनी तर माया साबळे, पुष्पा शिंदे, वंदना पानसरे व सुनीता परेराव या शिक्षकेत्तर कर्मचारांनी अथक प्रयत्न केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles