♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रसिद्ध कृषीतज्ञ, साहित्यिक सचिन होळकर यांना मान्यवरांच्या हस्ते खान्देश रत्न पुरस्कार प्रदान..

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

नाशिक मधील अत्यंत मानाचा समजला जाणारा खान्देश रत्न पुरस्कार लासलगाव येथील प्रसिद्ध कृषीतज्ञ, साहित्यिक सचिन आत्माराम होळकर यांना मान्यवरांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

आमदार सीमा महेश हिरे यांच्यातर्फे दरवर्षी नाशिक मध्ये खान्देश महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो.चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये सामाजिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या निवडक लोकांना खान्देश रत्न पुरस्कार दिला जातो.

या वर्षी नाशिक येथील ठक्कर डोम येथे झालेल्या शानदार कार्यक्रमांमध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री दादा वेदक, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, कार्यक्रमाच्या आयोजक रश्मी हिरे, नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे, भाजप नेते महेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला..
सचिन होळकर हे सुवर्णपदकासह कृषी पदवीधर असून गेल्या 22 वर्षांपासून ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरीव काम करत आहे. सचिन होळकर यांचे आजवर 8 पुस्तके तसेच विविध नियतकालिके, वृत्तपत्रे आणि मासिकांमधून 600 पेक्षा अधिक शेती आणि सामाजिक विषयांवरील लेख प्रसिद्ध झाले आहे, याशिवाय विविध आकाशवाणी केंद्र, विविध टीव्ही आणी रेडिओ चॅनल्स, तसेच विविध माध्यमांवरून शेती आणि सामाजिक विषयांवरील शेकडो मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. सचिन होळकर यांच्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा शेतीमित्र पुरस्कार तसेच त्यांच्या सहाव्या “शेती शोध आणि बोध” पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या वाङ्गमय मंडळाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे याव्यतिरिक्त त्यांना महाराष्ट्रातील विविध नामांकित संस्थेचे जवळपास 50 पुरस्कार मिळालेले आहेत. सचिन होळकर हे शेती आणि शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी निस्वार्थपणे काम करणारे अभ्यासू आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे. समाजातील विविध अडीअडचणी तसेच सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसाठी ते वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा तसेच वेळोवेळी आवश्यक सूचना ते करत असतात.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles