♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर वाहेगाव साळ येथे संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव वरिष्ठ महाविद्यालय विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालय (+2 स्तर) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर’ शनिवार दिनांक २३/१२/२०२३ ते शुक्रवार दिनांक २९/१२/२०२३ या कालावधीत संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव (साळ.), ता.चांदवड, जि.नाशिक या ठिकाणी संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नूतन विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य मा.श्री.हसमुखभाई पटेल यांनी भूषविले. सदर शिबिराचे उदघाटन वडाळीचे सरपंच मा.श्री नितिनदादा आहेर यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, मा.श्री.साहेबराव चव्हाण (सरपंच, पाटे), मा.श्री.एन.एस.मंडलिक (अध्यक्ष, म.फु.सा.कला क्रीडा व शिक्षण संस्था वाहेगाव), मा.श्री.संदीप पवार (सरपंच, वाहेगाव), मा.सौ.सीमाताई न्याहारकर (उपसरपंच, वाहेगाव), मा.श्री.केशव खैरे (माजी सरपंच, वाहेगाव) सौ.ज्योती खैरे (सदस्य ग्रामपंचायत), मा.श्री.चिंतामण रसाळ (चेअरमन, सोसायटी), मा.श्री.बाजीराव खैरे माजी चेअरमन) मा.श्री.केशवराव ठाकरे, मा.श्री.नंदकुमार मंडलिक, डॉ नारायण जाधव, डॉ.विलास खैरणार, पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, प्रा.रावसाहेब खुळे, प्रा.श्रीमती दिपाली कुलकर्णी प्रा.रामसिंग वळवी, प्रा.प्रभाकर गांगुर्डे, प्रा.जितेंद्र देवरे, प्रा.महेश होळकर, प्रा.दत्तात्रय गायकवाड, डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, डॉ.उज्वला शेळके, प्रा.मारोती कंधारे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.श्रीमती लता तडवी तसेच यावेळी वाहेगाव साळ ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सेवक सहकारी सोसायटी सदस्य, गावातील तरुण मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक- शिक्षकेतर वृंद, रा.से.यो.स्वयंसेवक इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल गायकर यांनी तर आभार प्रा.मारोती कंधारे यांनी मानले. या विशेष हिवाळी शिबिरात कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे आणि प्रा.मारोती कंधारे यांनी सर्व स्वयंसेवकांना योगाची माहिती सांगून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली.

या विशेष हिवाळी शिबिराच्या दरम्यान श्रमदानाच्या सोबतच संगीत खुर्ची, बौद्धिक खेळ, मॉडेल रिले, पेपर मॉडेल, जंगली मॉडेल, कॅम्प फायर अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित व्याख्यानमालेत दिनांक २३ डिसेंबर रोजी डॉ.आदिनाथ मोरे यांनी उद्घाटन प्रसंगी ‘लोकसंख्या नियंत्रण काळाची गरज’ या विषयावर मनोगत व्यक्त केले.

दिनांक २४ डिसेंबर रोजी “मानव एक साधनसंपत्ती” या विषयावर उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांनी मार्गदर्शन केले तसेच “महानायक सुभाषचंद्र बोस” या विषयावर पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी मार्गदर्शन केले. दिनांक २५ डिसेंबर रोजी “मूल्यशिक्षण” या विषयावर उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे यांनी मार्गदर्शन केले तर ‘भावना समजून घेताना’.. या विषयावर प्रा.किशोर अंकुळणेकर यांनी मार्गदर्शन केले. दिनांक २६ डिसेंबर रोजी प्रा.किशोर गोसावी यांनी ‘युवकांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर ‘आरोग्य शिक्षण’ या विषयावर डॉ.नारायण जाधव यांनी मार्गदर्शन केले.

दिनांक २७ डिसेंबर रोजी डॉ.विलास खैरणार यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन’’ या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ.बाजीराव आहीरे यांनी ‘ऊर्जा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. दिनांक २८ डिसेंबर रोजी डॉ.दत्तात्रय घोटेकर यांनी ‘युवक आणि व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले तर प्रा.जितेंद्र देवरे यांनी ‘आरोग्य विषयक चांगल्या सवयी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप चांदवड-देवळा विधानसभेचे आमदार मा.राहुल आहेर आणि वाकीचे सरपंच मा.श्री.अरुण देवढे, कार्यक्रमाचे अध्यक्ष लासलगाव महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, चांदवडचे PSI मा.श्री.सुरेश चौधरी, हेड कॉन्स्टेबल बागुल साहेब आणि डॉ.नितिन गांगुर्डे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, डॉ.नारायण जाधव, पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.के.डी.देवढे, प्रा.किशोर अंकुळणेकर, प्रा.वाल्मीक आरोटे, प्रा.सुनिल भागवत, वाहेगाव साळ चे सरपंच मा.श्री.संदीप पवार, पोलीस पाटील मा.श्री.दिपक खैरे, माजी सरपंच मा.श्री.केशव खैरे, तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.निवृत्ती न्याहारकर, सोसायटी चेअरमन मा.श्री.चिंतामण रसाळ, सोसायटीचे माजी चेअरमन मा.श्री.बाजीराव खैरे, चांदवड तालुका समता परिषद अध्यक्ष मा.श्री.नंदू मंडलिक, तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष मा.श्री.राजाराम मंडलिक, महात्मा फुले सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, वाहेगाव साळ चे उपाध्यक्ष मा.श्री.अरुण पुंड, मा.सौ.ज्योती खैरे, मा.सौ.अश्विनी खैरे, मा.सौ.मेघा मंडलिक यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विजयी स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात ५००मि. रस्ता तयार करण्यात आला तसेच ग्राम स्वच्छता, मूल्यशिक्षण, पर्यावरण जनजागृती, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान, आरोग्य शिबिर व आरोग्य सर्वेक्षण, व्यसन मुक्ती असे विविध उपक्रम राबविले तसेच प्रश्नावलीच्या माध्यमातून गावातील नागरीकांच्या विविध समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविक केले तर मा.श्री.नितीन आहेर, मा.श्री.अरुण देवढे, मा.श्री.सुरेश चौधरी साहेब, मा.श्री.दिपक खैरे, मा.श्री.केशव खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच स्वयंसेवकांमधून पल्लवी खैरनार, स्नेहल मुदगुल, तेजस्विनी शेळके, बबलू पातळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मा.प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मारोती कंधारे यांनी तर आभार प्रा.सुनिल गायकर यांनी मानले. सदर विशेष हिवाळी शिबिर यशस्वी होण्यासाठी नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.श्री.गोविंदरावजी होळकर, सर्व मनेजिंग बोर्डाचे सन्माननीय सदस्य, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, डॉ.उज्वला शेळके, प्रा.मारोती कंधारे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.लता तडवी, बाबा हरळे, नैनेश लासूरकर, सर्व रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी देखील वेळोवेळी या शिबिरास भेटी देऊन सहकार्य केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles