♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पोलीस रेझिंग डे व पत्रकार दिना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यातील मैत्री चषक पटकाविला नाशिक शहर पोलीस संघाने

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

दिनांक ०६/०१/२०२४ रोजी सकाळी ०८.३० वा. ते ११.०० वा. चे दरम्यान पोलीस परेड ग्राउंड येथे पोलीस रेझिंग डे व पत्रकार दिनाचे औचित्य साधुन मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस व पत्रकार बांधव यांच्यात समन्वय राहावा या दृष्टीकोनातुन पोलीस संघ व पत्रकार संघ यांच्यात आजरोजी किकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर क्रिकेट सामन्याचे उ‌द्घाटन मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे हस्ते करण्यात आले. मा. पोलीस आयुक्त यांनी नाणेफेक (टॉस) करून सदर सामन्यांना सुरूवात झाली. पोलीस संघाचे नेतृत्व श्री. प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त (गुन्हे) यांनी केले.

पत्रकार संघाने प्रथम फलंदाजी करतांना १० षटकात ६ गडी गमावुन ८० धावांपर्यत मजल मारली होती. त्यात पत्रकार श्री. किरण ताजणे, संदेश केदारे, मुकूल कुलकर्णी, व लक्ष्मण घाटोळ यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पोलीस संघापुढे ८१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

पोलीस संघाने ८१ धावांचा पाठलाग करतांना मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) व मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) या सलामी जोडीने डावाची सुरुवात उत्कृष्ट करुन धावफलक हलता ठेवला. त्यानंतर पो. निरी. युवराज पत्की, पो. निरी. गणेश न्हायदे, स.पो.निरी. हेमंत तोडकर, स. पो. निरी. सचिन चौधरी, पो.उ. निरी. दानिश मन्सुरी, यांनी उत्कृष्ट फलंदाजी करुन ८१ धावांचे आव्हान अवघ्या ०८ षटकात पुर्ण करुन मैत्री चषक पोलीस आयुक्त संघाने पटकाविला. मैत्री चषक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणा-या पत्रकार व पोलीस खेळाडुंचा मा. श्रीमती मोनिका राउत, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) यांचे हस्ते आकर्षक पारितोषीक देवून गुणगौरव करण्यात आला.

तसेच पत्रकार दिनानिमित्ताने मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देवून त्यांचा सत्कार केला. सदर सामन्यांसाठी सर्व पोलीस उपआयुक्त श्री. प्रशांत बच्छाव सर, श्री. किरणकुमार चव्हाण सर, श्रीमती मोनिका राउत मॅडम व सहा. पोलीस आयुक्त डॉ. श्री सिताराम कोल्हे सर, श्री. सचिन बारी सर, श्री. अंबादास भुसारे सर, व सर्व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी अधिकारी तसेच अंमलदार व नाशिक शहरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles