♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बाभूळगाव ता.येवला येथील एस एन डी अभियांत्रिकीच्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये निवड

जनहित न्यूज24 संपादकीय विभाग

बाभूळगाव ता. येवला येथील एस एन डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येवला येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाला. कॉम्पुटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मेकॅनिकल इंजिनीयरींच्या एकूण २४ विद्यार्थ्यांची निवड झाली.


कोरिझो प्रायव्हेट लिमिटेड बेंगरूळ मध्ये आठ विद्यार्थ्यांची वार्षिक सहा लाख पन्नास हजार पॅकेज वर निवड झाली

कॉप्युटर इंजिनियरिंगच्या रिया गुजराथी , सपना मढवाई , रुपाली कुदळ वैष्णवी पायमोडे अक्षदा हाके शुभदा बगळे वैष्णवी वाघ व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अफरोज शेख यांची निवड झाली.

क्यू स्पायडर प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीत एकूण १६ विद्यार्थ्यांची निवड झाली कॉम्पुटर इंजिनियरिंगच्या आदित्य आदमने , अक्षय लासुरे , अनिकेत शेळके ज्ञानेश्वर साळवे रुपाली कुदळ अश्विनी लोखंडे रोहन वखारे तेजश्री गायकवाड अनिकेत डांगे वैष्णवी वाघ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या नवनाथ पतंगरे , आकाश भामरे चंचल गवारे सदाफ शेख , अर्चित छत्रीय आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या अमोल गांगुर्डे यांची निवड झाली . एच मॅनेजर सिल्विया. व जेनिफर फर्नांडीस यांनी मुलाखती घेतल्या .

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी . एम यादव, कॉम्पुटर विभागप्रमुख डॉ उमेश पवार इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ प्रकाश रोकडे मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार प्लेसमेंट अधिकारी प्रा .अमित सोलंकी प्रा ललित पाटील यांनी अभिनंदन केले.

तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री. रुपेषभाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी शुभेच्छा दिल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles