♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

लासलगाव नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे आज १२ जानेवारी युवा दिनानिमित्त राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच श्री.रामनाथ कदम व श्री.शरद सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद या महापुरुषांबद्दल विचार आपल्या भाषणातून मांडले.

तसेच पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार आणि श्री.किशोर गोसावी यांनी देखील राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली व युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे आणि श्री.सुनिल गायकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री किशोर गोसावी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles