♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले ऐतिहासिक काळाराम मंदिरातील श्रीरामाचे दर्शन

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली.

यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8 व्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी मोदी यांनी संवाद साधला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles