♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य ईमारतीचे राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

 

निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य ईमारत आणि हेड क्वार्टर्स यांच्या ५ कोटी सव्वीस लाख रुपये निधीचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

या प्रसंगी डी.के.जगताप, सुवर्णा जगताप, पंढरीनाथ थोरे, अशोक नाना होळकर, कैलास सोनवणे, निलेश सालकाडे, प्रांत
सौ. हेमांगी पाटील,शरद घोरपडे तहसिलदार निफाड,
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

डॉ. भारती पवार यांनी निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य ईमारतीचे भूमिपूजन प्रसंगी संगितले की या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना पुढील काळात उत्तम उपचार सुविधांसाठी हे प्रथामिक आरोग्य केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण तसेच  दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी आरोग्य विभागाला आवश्यक निधी देण्यात आला आहे.

 

लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे दोन महिन्यापासून सोनोग्राफी मशीन सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की विकसित भारत संकल्प यात्रा हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही तर केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावागावांमध्ये पोहोचून भारत विकसित करण्याचा संकल्प आहे देशभर गावागावात कशाप्रकारे योजनांचा लाभ मिळत आहे.

याविषयी दररोज वरिष्ठ पातळीवरून आढावा घेतला जातो या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्याच्या, आयुष्यमान भारत, आवास योजनेची घरे, जलजीवन मिशन, उज्वला गॅस अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या योजना ह्या गावागावात पोहचत आहे की नाही हे पडताळून पाहणे व देशाला विकसित भारताकडे नेण्यासाठी प्रयत्न करणे हाच या यात्रेचा उद्देश असून या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्याचे काम करत असून ही संकल्प यात्रा म्हणजे विकासाचा रथ असल्याचे प्रतिपादन डॉ भारती पवार यांनी केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी सह मोठ्या प्रमाणात नागरिक ,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजाभाऊ चाफेकर यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles