♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘कर्तव्यपथ’ प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात नाशिक विभागातून केंद्रशासना द्वारे विशेष अतिथी म्हणून मत्स्यव्यवसाय करणारे रुपचंद वाघमारे व पत्नी सुरेखा वाघमारे यांची निवड

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रजासत्ताक दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या राष्ट्रीय परेड मध्ये उपस्थित राहण्या साठी नाशिक जिल्ह्यातील ओझारखेड धरण या ठिकाणी मत्स्यव्यवसाय करणारे नाशिक रोड येथे राहणारे वाघमारे दाम्पत्य यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

विशेष अतिथी म्हणून दिल्लीतील पंतप्रधान यांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या ‘कर्तव्यपथ’ प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात नाशिक विभागातून केंद्रशासना द्वारे विशेष अतिथी म्हणून मत्स्यव्यवसाय करणारे रुपचंद वाघमारे व पत्नी सुरेखा वाघमारे यांची निवड करण्यात आली असून, पत्राद्वारे प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग यांच्या कडून कळवले आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पा मध्ये महिला प्रवर्गातून उत्कृष्ट कामगिरी करण्यात आलेली आहे.

महिलांच्या सक्षमीकरना साठी लाभदायी प्रकल्प आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles