♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव बसस्थानकाची होणार पुनर्बांधणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

लासलगाव बस स्थानकाचे रुपडे पालटणार; ६ कोटी ७० लाखांच्या निधीतून होणार बसस्थानकाची पुनर्बांधणी

लासलगाव बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ४ कोटी ८० लाखांच्या व बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १ कोटी ९० लाखांच्या कामांना मंजुरी

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाच्या वतीने ४ कोटी ८० लाख तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत एमआयडीसी च्या माध्यमातून बसस्थानकाचे सौंदर्यीकरण योजनेतून बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १ कोटी ९० लाख असे अशा एकूण ६ कोटी ७० लाखांच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी होऊन प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 


लासलगाव बसस्थानकाचे बांधकाम सन १९७५ मध्ये झालेले आहे. सदर बसस्थानकाला सुमारे ४९ वर्षे झाल्यामुळे या बसस्थानकाची अतिशय दुरावस्था झालेली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा व शेतमालाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बसस्थानकातून दररोज ५३ बसेस सुटतात तर ५० हून अधिक खेड्यांमधील प्रवाशी या स्थानकाचा लाभ घेतात.

मात्र या बसस्थानकामधील असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने या बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता होती. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या माध्यमातून लासलगाव बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ४ कोटी ८० लाख तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियांनांतर्गत एमआयडीसीच्या माध्यमातून बसस्थानकाचे सौंदर्यीकरण योजनेच्या माध्यमातून बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शासनाच्या वतीने लासलगाव बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ कोटी ८० लक्ष रुपये निधीतून येथील बसस्थानकाचा तळमजला व पहिला मजला विकसित करण्यात येणार आहे. तसेच येथील बसस्थानकात नागरिकांना पिण्यासाठी तसेच वापरासाठी पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटिंग यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियांनांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडलाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या १ कोटी ९० लाखांच्या निधीतून बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यात येऊन सुसज्ज असे बसस्थानक विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिशय दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles