♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिकरांच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी आक्रमक हंडा मोर्चा काढण्याचा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीचा ईशारा

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

नाशिकरांच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी आक्रमक हंडा मोर्चा काढण्याचा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी दिला इशारा

नाशिक शहरातील विविध भागात पाणीपुरवठा कमी दाबाने व काही भागात पाणीपुरवठा होतच नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेत्रुत्वाखाली म.न.पा.च्या पंचवटी विभागीय कार्यालया समोर आंदोलन करण्यात येऊन प्रशासकीय अधिक्षक श्री. मंगेश वाघ यांना निवेदन देण्यात आले.

पंचवटी विभाग मधे शांतिनगर,रामक्रुष्ण नगर,हमालप्लॅाट,नवनाथनगर,उदयनगर,विद्यानगर,सत्यदेव नगर,समर्थ नगर आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असुन काही भागात पाणीच येत नाही.

अनेक भागात आज रोजी टॅंकर्स द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाण्या अभावी नागरिक ञस्थ झालेले आहेत.जो पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही,तो पर्यंत पाणीबिले आकारण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येऊन लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा महिलांना घेऊन हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ॲड.सुरेश आव्हाड यांनी दिला.

यावेळी लक्ष्मण काकड,पोपटराव कस्तुरे ,भास्कर गवळी,जगन्नाथ खुर्दळ,एकनाथ दिघे,बाळासाहेब तिडके,शंकरराव गांगुर्डे,दिनकर जाधव,पगार काका आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles