♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव रेल्वे उड्डाणपुल, लासलगाव विंचूर रस्ता लवकरच मार्गी लागणार छगन भुजबळ

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज थेटाळे येथे लासलगाव बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्र्वर जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जगताप परिवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, सुवर्णा जगताप, उपसभापती गणेश डोमाडे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब भवर, सरपंच दत्तुपंत डुकरे, दत्ताकाका रायते, डॉ.श्रीकांत आवारे, शिवाजी सुपनर, मधुकर गायकर, सरपंच शितल शिंदे, बबन शिंदे, राहुल डूमरे, उन्मेष डूमरे,तुकाराम गांगुर्डे, महिला अध्यक्षा सुरेखा नागरे, चाफेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. लासलगाव रेल्वे उड्डाणपुल, लासलगाव विंचूर रस्ता लवकरच मार्गी लागणार आहे.

तसेच रामाचे पिंपळस ते येवला पर्यंत चौपदरी करण रस्त्याचे काँक्रीटीकरण यासाठी ५६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरू सुरुवात करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर विकास ही न थांबणारी प्रक्रिया असून ही विकासाची कामे अविरत सुरू राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles