♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक उपनगर येथे झालेल्या गोळीबारातील गंभीर गुन्हयात फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

दिनांक ०२/०२/२०२४ रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्यीत साई श्रध्दा अपार्टमेंट, जयभवानी रोड, फर्नाडीस वाडी, नाशिक येथे फिर्यादी बर्खा अजय उज्जैनवाल हे ओळखत असलेले टक्या उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे, ईर्शाद चौधरी, दिपक चाटया व गौरव गांडले यांनी फिर्यादी यांचा मुलगा राहुल उज्जैनवाल याचे त्यांच्या परीसरात राहणारा मयुर बेद व संजय बेदच्या सांगण्यावरुन सर्वांनी संगणमत करुन व कट रचुन फिर्यादी यांचा मुलगा राहुल यास जिवे ठार मारण्याचे उद्येशाने पिस्तुल, कोयते असे घातक हत्यारे घेवुन फिर्यादी यांचा मुलगा राहुल मिळुन न आल्याने राहुल यास समोर आण नाहीतर तुझाच मुर्दा पाडतो असे म्हणुन त्याचा राग धरुन शिवीगाळ करुन फिर्यादीच्या दिशेने लांबुन पिस्तोल रोखुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने २ गोळया फायर केल्या म्हणुन उपनगर पोलीस स्टेशन कडे । गुरनं ३५/२०२४ भादंविक ३०७,१२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने गुन्हयातील आरोपी फरार झाले होते.

सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याकरिता मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. प्रशांत बच्छाव व मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते.

त्याअनुषंगाने दिनांक ०६/०२/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक व मानवी कौशल्य वापरुन आरोपीतांबाबत माहिती काढली की, आरोपी नामे टक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे हा गंगापुर गाव येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर माहितीवरुन सपोनि ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील अंमलदार यांनी गंगापुर गाव येथे सापळा रचुन नमुद गुन्हयातील आरोपी टक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे वय ३१ वर्षे रा. जेतवण नगर, जयभवानी रोड, सेंट झेव्हीयर्स हायस्कुलजवळ, नाशिक पुणारोड, नाशिक यास सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी श्री . संदीप कर्णीक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सपोउनि मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी.के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles