♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक पंचवटी पोलीसांनी ७,२७,१०४/-रुपये किंमतीचा जप्त मुद्देमाल पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे हस्ते फिर्यादी यांना हस्तांतरीत

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

 

पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात घडलेले मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीकोनातुन मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने दाखल मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आणणे, तसेच गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याकरीता, चौकी अधिकारी व अंमलदार, तसेच गुन्हे शोध पथक, यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेवुन गुन्हे उघडकीस आणुन त्यातील आरोपीतांकडुन गुन्ह्यातील  चोरलेला किंमती माल हस्तगत केला आहे.

तसेच गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण विभाग व CEIR पोर्टल व्दारे हस्तगत करण्यात आले आहेत, त्यामध्ये,

१) सोन्याचे चांदीचे दागिने

(सोने २. ७, घडी २५०)  एकुण रु. ७३,०००/- किंमतीचे

२) मोटार सायकली ४  एकुण किंमत रु.९५,०००/- किंमतीच्या

३) मोबाईल फोन ३० नग एकूण रक्कम रु. ५,५९,१०४/- किंमतीचे.

 एकूण रक्कम रु. ५,५९,१०४/- किंमतीचे.

सॅमसंग कंपनी ९ मोबाईल फोन ओपो कंपनीचे ७ मोबाईल फोन रेडमी कंपनीचे ६ मोबाईल फोन इतर मोबाईल फोनचे ८ मोबाईल फोन

असा एकुण ७,२७,१०४/-रुपये किंमतीचा मुद्देमाल.

वरील मुद्देमाल आज दिनांक १५/०२/२०२४ रोजी समारंभ पुर्वक श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर व  श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ यांचे मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयातील फिर्यादी व तक्रारदार यांना पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे आयोजित मुद्देमाल वाटप कार्यक्रमा दरम्यान सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

 

नमुद ३० मोबाईल फोन शोधण्याकरीता पंचवटी पोलीस स्टेशन कडील पोअं. / श्रीकांत साळवे व तांत्रिक विश्लेषण विभागा कडील अंमलदार यांनी प्रयत्न केले आहेत.

आजच्या कार्यक्रमाचे वेळी उपस्थित फिर्यादी यांनी मनोगत व्यक्त करून, पोलीस खात्या विषयी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

सदरची कामगिरी मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, डॉ. श्री. सिध्देश्वर धुमाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा / पंचवटी विभाग, वपोनि श्री. मधुकर कड, पोनि श्री. नंदन बगाडे (प्रशासन) पंचवटी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील चौकी अधिकारी, अंमलदार, गुन्हेशोध पथक, मुद्येमाल कारकुन, एटीसी पथक यांनी पार पाडली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles