♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पोलीस अधिकारी यांची जॉगींग ट्रॅक भेट. नागरीकांशी संवाद साधुन व त्यांचा फिडबॅक घेणार

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

नाशिक शहरात लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी त्यांना आरोग्य अबाधित राखण्यासाठी विविध ठिकाणी जॉगींग ट्रॅक उपलब्ध आहेत. सदर जॉगींग ट्रकवर नागरीक मोठ्या संख्येने सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही वेळी वॉकीग/जॉगींग साठी येत असतात.

पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतुन नागरीकांशी संवाद साधण्यासाठी व त्यांचे म्हणणे (फिडबॅक) जाणुन घेण्यासाठी दिनांक २४/०२/२०२४ सकाळी ०७.०० वा. पोलीस अधिकारी हे जॉगींग ट्रॅकला भेट देणार आहेत.

सदर जॉगींग ट्रॅक भेटी मध्ये पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त, सहा. पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार सहभागी होणार आहेत.

 भेट देण्यात येणारे नाशिक शहरातील एकुण जॉगींग ट्रॅक:- ३५

जॉगींग ट्रॅकला भेट देण्यासाठी नेमण्यात आलेले एकुण पो. अधिकारी:- ७८

सदर जॉगींग ट्रॅकला भेट देवून पोलीस अधिकारी नागरीकांशी संवाद साधतील व त्यांचे म्हणणे (फिडबॅक) जाणुन घेतील.

प्रत्येक जॉगिंग ट्रॅकसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असुन सदरचे नोडल अधिकारी सदर परिसराचे सुरक्षा ऑडिट करून सुरक्षा संबंधी उपाय योजना सुचवून त्याप्रमाणे मनुष्यबळ पेट्रोलिंगसाठी नेमणे व इतर उपाययोजना करतील.

सदरचे नोडल अधिकारी नॉगींग ट्रॅकला आठवडयातुन एकदा भेट देतील व नागरीकांशी वॉकमध्ये सहभागी होवुन त्यांचेशी संवाद साधतील. तसेच सुरक्षे संबंधी व पोलीसांच्या इतर कामकाजा संबंधी माहिती (फिडबॅक) घेतील.

प्रत्येक महिण्यांतुन एकदा वरिष्ठ पोलीस अधिकारी हे जॉगींग ट्रॅकला भेट देवुन नागरीकांशी संवाद साधुन व त्यांचे म्हणणे जाणुन घेणार आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles