♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक पंचवटी भागातील सुयोग हॉस्पिटलमधील डॉ. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

नासिक- पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीतील सुयोग हॉस्पिटलमधील डॉ. कैलास राठी यांच्यावर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. २३) रात्री ९.३० वाजता घडला होता.

 

डॉ. कैलास राठी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल्स येथे उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी महिलेच्या पतीने आर्थिक वादातून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हया प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्या रुग्णालयात २०२२ मध्ये रोहिणी दाते (मोरे) या जनसंपर्क अधिकारी म्हणून कामास होत्या, त्यांचा पती राजेंद्र मोरे हा २०१२ मध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता.

तेव्हापासून डॉ. राठी यांच्या तो संपर्कात होता. ओळख वाढल्याने डॉ. राठी यांनी म्हसरुळ परिसरात प्लॉटचा व्यवहार केला होता. यावरून दोन वर्षांपासून आर्थिक वाद सुरू होता.

डॉक्टर राठी यांनी संशयित मोरे याच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. त्यामुळे मोरे शुक्रवारी रुग्णालयात चर्चा करण्याकरिता आला होता. डॉ. राठी आणि मोरे केबिनमध्ये चर्चा करत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि संशयिताने कमरेला लावलेला कोयता काढत राठी यांच्यावर  वार केले.

डॉ. राठी यांनी मदतीकरिता आरडाओरड केल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न केला. आतून दरवाजा बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा नाइलाज झाला.

संशयिताने केबिनचा दरवाजा उघडून पलायन केले, गंभीर जखमी अवस्थेत डॉ. राठी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles