♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते अमृत भारत योजने अंतर्गत लासलगाव रेल्वे स्टेशनच्या कामाचे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा उद्घाटन…

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

अमृत भारत योजनेअंतर्गत आज भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे देशभरातील 508 स्टेशनच्या विकास कामांचे उद्घाटन केले या स्टेशन यादीमध्ये लासलगाव स्टेशनचा ही समावेश करण्यात आला आहे त्या निमित्ताने लासलगाव रेल्वे स्थानक येथे रेल्वे विभागातर्फे मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला.


अमृत भारत स्टेशन प्लॅन 2023 द्वारे भारतीय रेल्वे बोर्डाकडून रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे आणि त्यासोबतच या योजनेद्वारे योग्य प्रकारे डिझाइन केलेले चिन्ह, पदपथ, सुनियोजित पार्किंग क्षेत्र इत्यादींचीही व्यवस्था केली जाईल.

या व्यतिरिक्त, या योजनेद्वारे, वापरकर्त्यांना आनंददायी अनुभव देण्यासाठी लँडस्केपिंग, हिरवे पॅचेस, स्थानकांमध्ये स्थानिक कला आणि सांस्कृतिक घटक इत्यादींसह देशातील नागरिकांचा सहज प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी स्थानके सुधारली जातील.

उत्साही व्हा, योग्य व्यावसायिकांच्या मदतीने हे काम पूर्ण केले जाईल. मोफत वाय-फाय सुविधा दिली जाईल
या कार्यक्रमाप्रसंगी लोकनेते दत्ताजी पाटील, जिजामाता विद्यालय, तसेच सेवन डेज या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

उत्कृष्ट लेखन स्पर्धा, उत्कृष्ट वकृत्व तसेच इतर विविध स्पर्धेनिमित्त रेल्वे विभागातर्फे या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी लासलगाव कृषी बाजार समितीच्या मा. सभापती सौ सुवर्णा जगताप यांनी भुसावळ येथील डीविजनल रेल्वे मॅनेजर मा.श्रीमती इति पांडेय यांच्याकडे कोरोना काळानंतर बंद करण्यात आलेल्या देवगिरी, शालिमार एक्सप्रेस, जनता एक्सप्रेस, मुंबई हावडा मेल, इगतपुरी शटल इत्यादी गाड्यांचे थांबे पूर्वरत करण्यात यावे तसेच मनमाड सीएसटी गोदावरी एक्सप्रेस ही पूर्वीसारखी मनमाडहून सुरू करावी किंवा मनमाड आणि लासलगाव साठी सेपरेट बोगी देण्यात यावी अशी मागणी केली.

या यादीमध्ये लासलगाव स्टेशनचा समावेश केल्याबद्दल त्यांनी नरेंद्रजी मोदी, भारतीय ताई पवार तसेच रेल्वे विभागाचे आभार मानले.

या कार्यक्रमाप्रसंगी मा. आमदार कल्याण बापू पाटील,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मा सभापती सुवर्णा जगताप, मा. जिल्हा परिषद सदस्य डी के नाना जगताप, उपसभापती गणेश डोमाडे,लासलगाव येथील प्रभारी सरपंच रामनाथ शेजवळ, टाकळी येथील सरपंच अश्विनीताई जाधव, कोटमगावचे मा सरपंच तुकाराम गांगूरडे,ला.म.को.संचालक कैलास शेठ सोनवणे, भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक श्री उमेशकाळे, संजय शेवाळे,लासलगाव ग्रामपंचायत सदस्य शेखर होळकर, संतोष पलोड,अफजल भाई शेख, दत्ता पाटील, अमोल थोरे, गणेश निकम, राष्ट्रवादीचे सरचिटणीस बबनराव शिंदे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ चाफेकर, दत्तूलालजी शर्मा, नितीन शर्मा, राजू राणा, वाल्मीक गायकवाड, रमेश सालगुडे,सोमनाथ गांगूरडे,मनीष चोपडा, बापू लचके, कैलास जैन ,संदीप गायकर,सुनील नेवगे, लक्ष्मण खलसे, बाळासाहेब रायते ,रावसाहेब रायते,अयाज शेख,विनोद भोसले, भारती महाले,स्मिता कुलकर्णी,ज्योती शिंदे,ज्योती सुरासे,रंजना शिंदे,नंदा शर्मा,सीमा दरेकर,उषा कुमावत, अनिता खैरे,रेणू हिरे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles