♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रन फॉर नेशन ,रन फॉर मोदी ही टॅगलाईन घेऊन महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाशिक जिल्हा उत्तर विभागाच्या सरचिटणीस तथा संयोजिका दिंडोरी मतदार संघ च्या सौ सुवर्णा जगताप यांच्या आयोजन व नियोजनातून आणि नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष शंकर वाघ ,महिला मोर्चा अध्यक्षा सोनालिराजे पवार ,मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे यांच्या उपस्थितीत सोमवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये लासलगाव येथील थेटाळे कोटमगाव रोड परिसरात नारी शक्ती वंदन मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.

याला महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन सकाळी ९.३० वाजता मॅरेथॉन ला सुरुवात केली.भारत माता की जय,वंदे मातरम,रन फॉर नेशन- रन फॉर मोदी अशा घोषणा देत सर्व महिलांनी २ किलोमीटर ची मॅरेथॉन पूर्ण केली.

समारोपाच्या वेळी शंकर वाघ ,सुवर्णा  जगताप,सोनालिराजे पवार यांनी महिलांना मार्गदर्शन करताना मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास होत आहे.

आपला भारत देश हा पदोपदी प्रगती करत आहे. याप्रसंगी महिलांचे आरोग्य व केंद्र सरकार द्वारा महिला व देशातील नागरिकांसाठी चालविल्या जाणाऱ्या लोक कल्याणकारी योजना बद्दल माहिती दिली व उपस्थित नागरिकांना आव्हान केले की प्रत्येकानी योजनांचा लाभ घ्यावा.

भारतीय महिलांना सशक्त बनविण्याचा पीएम मोदींचा दृष्टिकोन आहे. नरेंद्र मोदी ज्या विकसित भारताची संकल्पना करतात ते केवळ आणि केवळ नारी शक्ती च्या आशीर्वादाने संभव आहे व ते यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत असे सुवर्णा जगताप यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठीथेटाळे गावच्या सरपंच शितल शिंदे ,ज्ञानेश्वर शिंदे, सोनाली शिंदे सर्व भा.ज.पा. पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी राजेंद्र चाफेकर,अनुपमा मढे,डॉ सारिका डेरले,रंजना शिंदे,शैलजा भावसार,नलिनी शिंदे,भारती महाले,उषा कुमावत,योगिता आंबेकर,सिंधू पल्हार,कल्पना वाघ,उत्तम शिंदे,सुनील नेवगे,सागर शिंदे,तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

परिसरातील जवळपास ४०० पेक्षा अधिक महिलांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदिविला होता. आलेल्या सर्व महिलांना अल्पोहार देऊन महिलाच्या उज्वल भविष्याची कामना करत आयोजकांतर्फे सगळ्यांचे आभार मानण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles