♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल मध्ये राष्ट्रीय महिला दिन मोठया उत्साहात साजरा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

श्री. नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल मध्ये राष्ट्रीय महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव डॉक्टर वैशालीताई पवार, अध्यक्ष प्रतापराव पवार, नवनिर्वाचित जलसंधारण अधिकारी कु.आरती दरगुडे, पिंपळगाव नजिक च्या उपसरपंच सीमा दरेकर, अनाथांची माय संगिता गुंजाळ, शिवसेना पदाधिकारी रोशनी ताई कुंभार्डे, टाकळीच्या सदस्य ज्योतीताई सुरासे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.संगीता सुरसे, तसेच, अक्षरताई जोशी, संगिता ताई आव्हाड,कविता चव्हाण, मनीषा घोडके, रोहिणी जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापराव पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नवनिर्वाचित जलसंधारण अधिकारी आरती ताई दरगुडे त्यांनी विद्यार्थ्यांना उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

महिला दिनाच्या औचित्य साधून आलेल्या महिलांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला, तसेच महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता देसाई मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्याहारकर मॅडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पोळ यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles