♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महिला दिना निमित्त स्त्री शक्तीचा जागर

जनहित न्यूज24 निफाड ता.ब्युरोचीफ:कैलास उपाध्ये

संस्कार इंग्लिश मिडियम स्कुल, लासलगाव तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून वार्षिक बक्षिस वितरण सोहळ्याचे आयोजन 11/3/2024 रोजी करण्यात आले.

 

महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देवून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थांना खेळाचे महत्त्व सांगून खेळामध्ये मिळवलेल्या प्राविण्याबद्दल बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहीदवीर पत्नी रोहिणीताई ढोमसे बिकट परिस्थितीत आपल्या मुलांसाठी खंबीरपणे उभ्या रहाणाऱ्या लक्ष्मीताई वाणी , निफाड तालुक्यातील पहिली समुद्र कन्या श्रावणी देसाई तसेच शाळेच्या संचालिका मनिषाताई होळकर , रश्मीताई दगडे, नंदाताई डमरे व मुख्याध्यापिका अश्विनी कुशारे हया उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व प्रतिमा पूजनाने झाली. श्रावणी देसाई यांनी विद्यार्थ्यांना जिद्द असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रातून यशाचे शिखर गाठू शकतो हे सांगितले.

शाळेची विद्यार्थीनी शारिया शेख व सहाय्यक शिक्षिका सारिका पाटील यांनी महिलांवर आधारित स्वरचित कविता सादर केली. सहाय्यक शिक्षिका मनिषा लोहकरे, शबाना काद्री यांनी आपल्या गाण्यातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

कार्यक्रमादरम्यान स्त्रीयांना प्रेरणा देणारी सन्मान नारी शक्ती ग्रुप, सनशाईन फेस ग्रुप, एव्हरग्रीन ग्रुप,तसेच संस्कार शिक्षिकावृंद ग्रुप यांचे महिलांना प्रेरणादायक नृत्य सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली नाईक आणि रोहिणी बोरसे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली.या कार्यक्रमासाठी मंगला कदम, योगिता पाटील ,सुरेखा भावसार, , रायते प्रमिला, अनुश्री कदम, शिरिन शेख, सविता दरेकर, शुभांगी जाधव, सोनाली ठोमरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles