♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गंगापुर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गुन्हेगारांना दोन वर्षाकरीता केले हद्दपार 

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

नाशिक सारख्या शांतताप्रिय शहरात समाज कंटकांकडुन परिसरातील जनतेच्या मनात भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास येत होते.

सदर प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी मा. संदिप कर्णिक सो. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.

दरम्यान गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत जाळपोळ, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशिर हत्यारे बाळगणे, दंगल घडवुन आणणे यासारखे गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगार

नामे १) राहुल मच्छिंद्र पवार, वय- ३० वर्षे, रा. लता खैरनार यांचे घरात, गंगापुरगाव, नाशिक,

२) राहुल दिलीप जाधव, वय २४ वर्षे, रा. ध्रुवनगर, जेनिका ग्लोरी सोसायटी, फ्लॅट नं.३, गंगापुररोड, नाशिक

यांनी ध्रुवनगर येथील एका घरास आग लावुन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच गुन्हेगार राहुल पवार व राहुल जाधव यांचेविरूध्द यापुर्वीही मारहान करणे, खुनाचा प्रयत्न करणे व मालमत्तेचे नुकसान केलेबाबत गुन्हे दाखल आहेत.

आरोपीच्या दहशतीमुळे त्यांचेविरुध्द कुणीही तक्रार देण्याकरीता धजावत नसल्याने त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस उपायुक्त  परिमंडळ-१, नाशिक शहर यांनी आदेश पारित करून दोन्हीही गुन्हेगारांना नाशिक शहर व नाशिक जिल्हयातुन दोन वर्ष कालावधीकरीता हद्दपार केले आहे.

तसेच यानंतरही नाशिक शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास अशाच प्रकारच्या कडक प्रतिबंधक कारवाया करण्यात येणार आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles