♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आजची महिला आर्थिक व डिजिटल दृष्ट्या साक्षर होणे हि काळाची गरज- सौ. सुवर्णा जगताप

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

आज लासलगाव येथे हिंदुस्थान कोको बेव्हरेज प्रा ली यांच्या सीयेसआर फंडातून डिजिटल महिलांसाठी आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे पुस्तिकेचे उद्घाटन आज आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी झूम मीट द्वारे सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी लासलगाव , कोटमगाव,थेटाले,टाकळी,पिंपळगाव नजीक परिसरातील बचतगट व सीआरपी महिलांनी मोठ्या प्रमाणात हजरी लावली होती.


आरोग्यराज्यमंत्री भारती पवार यांनी झूम मीट द्वारे महिलांना मार्गदर्शन करताना आर्थिक डिजिटल संकल्पना ही मजबूत भारताचा आधारस्तंभ आहे हे सांगितले.सुवर्णा जगताप यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना आजची महिला आर्थिक व डिजिटल साक्षर झालीच पाहिजे म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सरकारने महिलांसाठी अनेक प्रकारच्या नवनवीन योजना चालू केलेल्या आहेत त्याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा हे सांगितले.

मुद्रा लोन योजना,बचत गट योजना, अटल पेन्शन योजना यासारख्या विविध योजना महिलांसाठी कशा उपयोगी आहेत याचे महत्त्व त्यांनी यावेळेस पटवून सांगितले.प्रेसिडेंट प्रफुल्ल निकम यांनी डिजिटल साक्षरते संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी अनिता गंधे, डॉ.वैशाली पवार व ऐश्वर्या जगताप यांनी महिला सबलीकरण व शक्ती करना संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.डिजिटल साक्षरता ही काळाची गरज आहे त्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी वाय फोर डी फाउंडेशन पुणे चे प्रेसिडेंट प्रफुल जी निकम, कोको कोला कंपनीचे झोनल मॅनेजर के.के. जोसेफ सर, कोको कोला कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर चंद्रशेखर पायधन हे ऐल होते,तसेच प्रमुख अतिथी म्हणून लासलगाव ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता पाटील, वनस्थळी लासलगावच्या संस्थापिका अनिता शिरीष गंधे, आरपीआय लासलगाव च्या महिला अध्यक्ष भारती रामनाथ शेजवळ, थेटाळे येथील सरपंच सौ शितल बबन शिंदे, टाकळी विंचूरच्या सरपंच सौ अश्विनी राजेश्वर जाधव, कोटमगावच्या सरपंच सौ आरती संदीप कडाळे, जैन महिला मंचाच्या जिल्हाध्यक्ष सौ अमिता अक्षय ब्रह्मेचा, माहेश्वरी महिला मंच लासलगावचे अध्यक्ष सौ संगीता ओमनिवास चांडक, डॉक्टर असोसिएशन लासलगाव उपाध्यक्ष डॉक्टर उषा बंदछोडे, नेताजी सुभाष चंद्र बोस गुरुकुल लासलगावच्या सेक्रेटरी डॉक्टर वैशाली प्रतापराव पवार, नॅशनल उर्दू हायस्कूल लासलगाव चे सेक्रेटरी सौ हसीना हरूनभाई शेख, वनसगाव येथील औषध निर्माण अधिकारी सौ डॉ. शीतल योगेश डुंबरे, बचत गट सारोळ्याचे अध्यक्ष सौ विमल दत्तोपंत डुकरे, खडक माळेगाव येथील पोलीस पाटील सौ वैशाली दत्तात्रय बाजारे, ब्राह्मणगाव वनस च्या सरपंच सौ प्रमिला विनायक चौधरी यांनी उपस्थिती दिली.

तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नलिनी शिंदे,शैलजा भावसार,नंदा शर्मा, रुपा केदारे, रंजना शिंदे, ज्योती शिंदे, भारती महाले,सोनाली शिंदे,सिंधुताई पल्हार,उषा कुमावत ,अनिता खैरे,पूजा भावसार ,कल्पना वाघ,योगिता आंबेकर यांनी प्रयत्न केले.लासलगाव व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार देवरे आणि नलिनी शिंदे यांनी केले.

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles