♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता भूसंपादनासह इतर कामांसाठी १०९ कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

लासलगाव,दि.१४ मार्च :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रकाशा – लासलगाव – विंचूर रस्त्यावर लासलगाव गावाजवळ रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी बाह्यवळण रस्त्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासह राहिलेल्या कामासाठी १०९ कोटी ८८ लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव रेल्वे उड्डाणपुलासह बाह्य वळण रस्त्याचे काम करण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही काही भागात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने रस्त्याचे काम रखडलेले होते.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली होती. या बैठकीत सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी सबंधित विभागाला दिलेल्या होत्या.

या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी लासलगांव गावाजवळ रेल्वे उड्डाणपुल व पोहच मार्ग कामाला लवकर सुप्रमा देऊन हे काम पूर्ण करण्यात यावी अशा सूचना केल्या. या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून १०९ कोटी ६६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.


चांदवड लासलगांव विंचुर सावळी विहीर रामा ७ या रस्त्यावर लासलगांव येथे आशिया खंडातील काद्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. राज्यमार्ग क्र. ७ हा रस्ता लासलगांव शहरातून जात असल्यामुळे या रस्त्यावर शेतीमालाची तसेच अवजड वाहनाची मोठ्या प्रमाणात वाहतुक वर्दळ आहे.

या रस्त्यावर सा.क्र. १९२/५०० मध्ये मुंबई भुसावळ या मार्गावर रेल्वेगेट (क्र. १०५) आहे. या मार्गावर रेल्वेची मोठ्या प्रमाणात वाहतुक असल्यामुळे (TVU ३८०५१५ ) या राज्यमार्गावरील वाहतुकीस रेल्वे गेटमुळे अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची सतत कोंडी होत असते. त्यामुळे लासलगाव वळण रस्ता व उड्डाणपुलाचे बांधकाम लासलगाव शहराच्या वाढत्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक होते.


त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने रु.६९,७६,००,०००/- इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली होती. या निधीमधून सन २०२२ मध्ये रेल्वे उड्डाणपूल व पोहोच मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र बाह्य वळण रस्त्याचे भूसंपादन बाकी असल्यामुळे उड्डाणपूल पूर्ण होवूनही या उड्डाणपूलावरून वाहतूक सुरु झालेली नाही.

तसेच सदर बाह्यवळण रस्त्याच्या बांधकामासाठी भूसंपादन प्रक्रीया प्रगतीत आहे. जिल्हाधिकारी नाशिक यांनी दिनांक १३ जानेवारी २०२२ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेल्या दराची परिगणना करुनउपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग, निफाड यांनी त्यांचे पत्र क्र. भुसं/कावि/१६१/२०२२,दि. १६ मार्च २०२२ अन्वये एकुण रु.३१.३६ कोटी इतकी रक्कम भूसंपादनासाठी कळविण्यात आलेली आहे. तसेच कामाची भाववाढ, Royalty and Testing Charges व इतर अनुषंगीक बाबीची वाढ झाल्याने प्रशासकीय मान्यतेमध्ये या रकमेची तरतुद नसल्याने मुख्य अभियंता यांनी सुधारीत प्रशासकीय मान्यतेस्तव रक्कम रु.१०९.६९ कोटीचे अंदाजपत्रक सादर केलेले होते.त्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे भूसंपादन आणि इतर रखडलेली कामे मार्गी लागून दळणवळणाच्या सुविधा प्राप्त होणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles