♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाईन पर्ल्स हॉस्पिटल येथे जागतिक किडनी दिन रॅली काढून व प्रबोधन करून साजरा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो..
यंदाच्या वर्षी “किडनी आरोग्य सर्वांसाठी” ही थीम घेऊन किडनी दिवस साजरा होत आहे.

याचेच औचित्य साधून नाईन पर्ल्स हॉस्पिटल येथे जनजागृती पर रॅली काढण्यात आली रॅलीचा मार्ग नाईन पर्ल्स हॉस्पिटल ते मुंबई नाका असा होता यादरम्यान आडके नर्सिंग इन्स्टिट्यूट चे सर्व शिक्षक वृंद, प्राचार्य ,विद्यार्थी तसेच हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी, प्रशासन मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर रॅली दरम्यान ‘पाणी प्या किडनी वाचवा’, ‘हिरो बना किडनी दान करा’ अशा प्रकारच्या विविध जनजागृती पर घोषणा देण्यात आल्या.


नाईन पर्ल्स हॉस्पिटल येथे रॅलीची सांगता होऊन डॉक्टर नागेश अघोर (किडनी विकार व ट्रान्सप्लांट तज्ञ, नाईन पर्ल्स हॉस्पिटल) यांनी उपस्थितांना किडनी लक्षणे, काळजी व उपाय या विषयी मार्गदर्शन केले.

विशेष बाब म्हणजे सदर रॅलीच्या दरम्यान किडनी आजारामुळे डायलिसिस घेणारे रुग्ण यांनी देखील आपला सहभाग नोंदवला व नागरिकांना अहवान केली कि आपल्या किडनीची काळजी आपण स्वतः घेऊन आपले जीवन सुखी बनवा.

या रॅली च्या प्रसंगी हॉस्पिटलचे सर्व संचालक डॉ. नागेश अघोर, डॉ. दिनेश वाघ, डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. हुसेन बोहरी, डॉ. शीतलकुमार हिरण, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. धनंजय डुबेरकर, डॉ. विनायक शेणगे, डॉ. योगेश चौधरी, स्त्री रोग तज्ञ डॉ. क्षमा अघोर, हॉस्पिटल केंद्र प्रमुख श्री जॉन प्रिजू हे उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles