♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे नवीन शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून २ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

 राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव येथे नवीन प्रशासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या नवीन प्रशासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन लासलगाव येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय विश्रामगृह साकारले जाणार आहे.

लासलगाव येथील प्रशासकीय विश्रामगृह हे अतिशय जुने झाल्याने त्याची पडझड होऊन दुरावस्था झालेली होती. याठिकाणी सर्व सुविधायुक्त नवीन प्रशासकीय विश्रामगृह उभारण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार या नवीन प्रशासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या नवीन प्रशासकीय विश्रामगृहात एक मजली इमारत, इलेक्ट्रिकल कामे, अग्निशामक यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, पम्प हाउस, सीसीटीव्ही, जनरेटर, पाणी पुरवठा, फर्निचर, संरक्षण भिंत, पाण्याची टाकी, पार्किंग, विद्युत पोल यासह विविध विकासकामांचा समावेश आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles