♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिक येथील के .के वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा 

जनहित न्यूज24 संपादकीय विभाग

१५ मार्च २०२४ रोजी जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्र व के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था नाशिक यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राहक जागरूकता सत्र घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. पियुष जोशी यांनी १५ मार्च- जागतिक ग्राहक दिनाचे महत्व तसेच आदरणीय बिंदुमाधव जोशी यांची ग्राहक चळवळ यांची पार्श्वभूमी नमूद केली.

यात ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक जिल्हा संघटक श्री. दत्ता शेळके यांनी ग्रहांचे हक्क- अधिकार तसेच कर्तव्य यावर सविस्तर उदाहरणांसह ग्राहकांचे हक्क- अधिकार तसेच बिल, ऑनलाईन व्यवहार करताना घ्याची खबरदारी, फसवणूक झाल्यास बँकांना करावयाच्या तक्रारी इत्यादी त्यांच्या संपर्क क्रमांक यासह मार्गदर्शन केले.

सामूहिक ग्राहक प्रतिज्ञा सिन्नर तालुका संघटक श्री. विश्वनाथ शिरोळे यांनी उपस्थित विद्यार्थी- शिक्षकांना सादर केली. सदर कार्यक्रमास ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे महानगर अध्यक्ष श्री. प्रकाश जोशी, विश्वनाथ शिरोळे व के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था नाशिकचे डॉ. वेंकट माने, डॉ. सुयोग जैन, प्रा. विजय मवाळ, ग्रंथपाल प्रा. डॉ. बोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. स्वानंद डोंगरे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. पियुष जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. समीरदादा वाघ, प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, उप-प्राचार्य डॉ. साने यांचे सहकार्य लाभले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles