♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव बाजार समिती समोरील कोटमगाव रोड येथील दुकानास भयंकर आग प्रशासन अग्निशमन दलाची उणीव कधी करणार पूर्ण ?

जनहित न्यूज24 निफाड ता.ब्युरोचीफ:कैलास उपाध्ये

 

अग्निशमन विना अजून किती दुकान आगीचा भक्षस्थानी पडतील- भैय्या नाईक

लासलगाव च्या जनतेची मागणी होईल का पूर्ण प्रशासन अग्निशमन दलाची मागणी करेल का पूर्ण का अजून काही दुकाने जळण्याची वाट बघणार ?

लासलगाव : येथील कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्र या मोठ्या कृषी उपयोगी औषधे कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्या दुकानास रविवारी दुपारी अंदाजे दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून या दुकानात असलेल्या सर्व मालाची राख रांगोळी होऊन संपूर्ण माल आगीत भस्मसात झाला.

अग्निशमन विना थोड्या दिवसांपूर्वी कोटमगाव रोडवरील बी जे कॉप्लेक्स मधील दुकानांना लागलेल्या आगीत भयंकर झलेली नुकसान अजून त्याचा विसर पडला नाही त्यात आजची ही आग तरी सुद्धा प्रशासनाची झोप उडत नाही व अग्नीनिशमन दलाची पूर्तता होत नाही.

 

याबाबत माहिती अशी की, कोटमगाव रस्त्यावर रासायनिक खतांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. आज रविवार असल्याने योगेश कृषी सेवा केंद्र हे दुकान बंद होते. दुपारी अचानक बंद पत्र्याच्या मोठ्या दुकानातून धूर निघू लागला. नंतर या आगीने रौद्ररूप धारण केले आणि आतील काही रासायनिक औषधांच्या बाटल्या आणि ड्रम फुटून किरकोळ फटाक्यांचा आवाज येऊ लागला.

आग लागल्याचे पाहून लासलगाव येथील युवक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि डि.के. जगताप ,निरंजन ट्रान्सपोर्ट लासलगाव बाजार समिती यांच्यासह विविध नागरिकांनी स्वतःच्या पाण्याची टँकर आणून तिथे आग विझविण्याचा मोठा प्रयत्न केला.

सुमारे अर्धा पाऊण तासानंतर पिंपळगाव, चांदवड, निफाड येथून अग्निशामक दलाचे बंब आल्यानंतर आगीचे प्रमाण थोडेफार कमी झाले.

परंतु प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट आकाशात दिसू लागल्याने नागरिक भयभीत झाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके व औषधांचा साठा असल्याने विषारी वायूचा उग्र वास पसरला होता.

लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन मदत कार्य केले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही तसेच किती रुपयांचे नुकसान झाले ते देखील समजू शकले नाहीत.

मात्र आतील मोठ्या प्रमाणावर खते औषधे आणि कीटकनाशके बी बियाणे जळून भस्मसात झाली. लासलगाव येथील सर्वच संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते नेते आणि युवक मोठ्या प्रमाणावर आग आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावत होते.

लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण ऊदे आणि उपनिरीक्षक सुरवसे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांनी तातडीने मदत कार्यात लक्ष घातले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles