♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून लासलगाव विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरण करण्यास १३४ कोटी १८ निधीस मंजुरी

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या १४.१०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी १३४ कोटी १८ लक्ष इतका खर्च येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक अंतर्गत निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचूर रामा ७ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता विंचूर येथे रामा क्र. २ या चौपदरी रस्त्याला मिळतो.

लासलगाव येथे आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या रस्त्यावर दळणवळण अधिक असल्यामुळे सतत अपघात होत असतात. त्यामुळे चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न होते. त्यांच्या विशेष पाठपुराव्याने महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर हा ९.६०० किलोमीटर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या १४.१०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी १३४ कोटी १८ लक्ष इतका खर्च येणार आहे.

लासलगाव विंचूर हा अतिशय वर्दळीचा रस्ता असून या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने येथील रस्त्यावरून येणारे वाहतुकीचे अडथळे कमी होणार आहे. तसेच या रस्त्यावरील अपघातांना देखील आळा बसणार आहे. त्याचबरोबर लासलगाव येथून सिन्नर व शिर्डीकडे जाणारा बोकडदरा खेडलेझुंगे रस्त्याची रुंदी ५.५ मीटर वरुन ७ मीटर होणार असल्याने या रस्त्यावरील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लगेच कामाला सुरुवात होणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles