♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

निफाड तालुक्यातील भरवस वाहेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण सोहळा व भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:,श्री.राजेंद्र देसरडा

श्री जगदगुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर ३७५ व्या अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील भरवस वाहेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण सोहळा व भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत आळंदी देवाची येथील ह.भ.प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्यासह शिष्टमंडळाने आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेतली व सोहळ्याचे निमंत्रण दिले.

यावेळी मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ह.भ.प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब भवर,दत्ता रायते,पांडुरंग राऊत, महेश मेथे, बाळासाहेब मुद्गुल,प्रमोद नाईक, संजय कांगणे, पप्पु शिंदे, सागर विहित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles