♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस लासलगाव मंडलात साजरा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:श्री राजेंद्र देसरडा

भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस लासलगाव मंडलात संपन्न संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024 रोजी 44 वा स्थापना दिन (वर्धापन दिन) भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर यांच्या नेतृत्वात तर भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा सौ स्मिता ताई कुलकर्णी मंडल उदयोग आघाडी अध्यक्ष नितीन शर्मा उपाध्यक्ष ऍड उत्तम नागरे यांच्या आयोजनात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला लासलगाव मंडल निवडणूक प्रमुख आर्कि अमृता ताई पवार होत्या तसेच प्रमुख पाहुणे नामको बँक संचालक प्रकाश शेठ दायमा होते .

यावेळी भारतीय जनता पार्टी साठी अहोरात्र मेहनत घेणारे घराघरात भाजपा पोचवणारे जेष्ठ दिगग्ज व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यात लासलगाव येथील कट्टर जनसंघ ते हिंदुत्व कार्य करणारे बाळासाहेब होळकर (छत्र) ,विठ्ठल काका शिरसाठ यांच्या स्नुषा मंगलताई शिरसाठ प्रकाश शेठ दायमा,,मयूर भाऊ झांबरे,प्रदीप भाऊ माठा,बोडके काका यांचा सत्कार करण्यात आला .

 

कार्यक्रमाची प्रस्तावना व शतप्रतिशत मतदान करण्याचे आवाहन मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे यांनी केले व 44 वर्षाचा भाजपा प्रवास जेष्ठ नेते तथा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चाफेकर यांनी मांडला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर आधारीत देशातील सर्वात पहिला विरोधी पक्ष म्हणून एकात्म मानवतावाद या मुळ तत्त्वज्ञानाच्या आधारावर राष्ट्रनिष्ठा, लोकशाहीवरील निष्ठा, आर्थिक समता व सामाजिक न्याय सिध्दांतावरील निष्ठा, सर्वपंथ समभाव निष्ठा व मुल्याधारित राजनितीवरील निष्ठा या विचारांनी कार्यकर्त्यांनी कार्य केलेले आहे .

 

आगामी काळात लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार चा नारा देत होणाऱ्या कोणत्याही निवडणूक साठी भाजपा निष्ठावंत संघटनात्मक टीम सदैव सज्ज आहे भारत माता की जय वंदे मातरम ने परिसर दुमदुमून गेला रवींद्र होळकर यांनी या निमित्य गोरगरीब लोकांना थंड उसाचा रस वाटप केला यावेळी मंडल सरचिटणीस निलेश जगताप,रजनी कुलकर्णी,सचिन लचके,राजेंद्र सुरसे, संतोष पवार,संजय विळाजें, योगेश हिंगमीरे, गोपी गौड व इतर पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles