♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा…

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:,राजेंद्र देसरडा

शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष स्थापना दिनाच्या निमित्ताने आज लासलगाव येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारतीय जनसंघेचे संस्थापक आदरणीय दीनदयालजी उपाध्याय आणि मा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ,पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे औचित्य साधून लासलगाव येथील जेष्ठ भाजप नेते आणि हितचिंतक राजेंद्रजी चाफेकर, दत्तूलालजी शर्मा, पलोड सर,सुरेशजी नहाटा, राजेशजी सुरसे, प्रदीपजी माठा ,सुधीरजी झांबरे ,सुनीलजी डचके या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पक्ष कसा वाढवला ,किती अडचणी आल्या तरीही ठाम भूमिका घेऊन कायम भाजप मधेच राहिलो असे राजाभाऊ चाफेकर यांनी मनोगतात व्यक्त केले.

 

पलोड सरांनी देश धर्म पक्ष यावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रसार आणि प्रचार वाढविण्यास सांगितले.

सुवर्णा जगताप यांनी भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपेक्षा आपला लोकसभा ,आपले गाव आणि आपला बुथ यावरच काम करुन प्रत्तेक बूथवर ५१ टक्के भाजपसाठी मतदान करण्याचे आणि वाढवण्याचे आवाहन केले.यावेळी निलेश सालकाडे,प्रदीप माठा आणि सुनील डचके यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी सुवर्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव येथील महिलांनी भाजपामध्ये प्रवेश करत त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन प्रकोष्ठ प्रदेश सदस्य मनीष चोपडा यांनी केले.

आलेल्या सर्वांना अल्पोपहाराचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुवर्णा जगताप,लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चाफेकर,दत्तुललजी शर्मा,शहर अध्यक्ष शेखर होळकर, मंडल सरचिटणीस निलेश जगताप,मनीष चोपडा,बापू लचके, सचिन लचके, पलोड सर,सुनील नेवगे, लक्ष्मण खलसे, विजय कांकरिया, अमोल वाघमारे,शितल ताथेड, राजेंद्र पटणी, आयाज शेख, संतोष गोसावी, दिनेश ताथेड, नितीन साळवे, विक्रम वानखेडे, कैलाश जैन ,नलिनी शिंदे,रूपा केदारे,शैलजा भावसार, ज्योती शिंदे, रंजना शिंदे, कल्पना वाघ, उषा कुमावत, रेणू हिरे, सगुणा शिंदे, संगीता वाघ, राणी धाडीवाल, संगीता बागुल तसेच भाजपातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles