♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नामदार भारतीताई पवार यांच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंचा विषय लागला मार्गी …

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

नासिक जिल्ह्यातून बाबा अमरनाथ यात्रेसाठी हजारो भाविक भोले बाबांच्या दर्शनासाठी जात असतात.

जम्मू काश्मीर मधील अमरनाथ जाण्यासाठी अमरनाथ शाईन बोर्ड मेडिकल साठी राज्यातून मोजके रुग्णालय नमूद करत असतात.
२०२४ या वर्षी शाईन बोर्ड ने रुग्णालयांची लिस्ट जारी केली आणि परिसरातील यात्रेकरूंची पायाखालची जमीन सरकली व सर्व यात्रेकरू नाराज होताना दिसून आले,सर्वांच्या मुखातून एकच प्रश्न आता मेडिकल च काय होईल कस होईल रेल्वे रिझर्वेशन झालेले आहे, पुढील गाड्या चे नियोजन झालेले आहे मेडिकल नाही झाले तर परमिट नाही आणि परमिट नाही तर पुढील यात्रा होणार नाही.

परन्तु भोले बाबा ज्यांना दर्शनासाठी बोलवतात त्यांना कोणी अडथळा आणू शकत नाही.

अशा वेळी धावून आले ते लासलगाव येथील अमरनाथ यात्रेकरू शोभराज बागमार, महेश होळकर,अनिल भावसार व देवळाली येथील सतीश कांडेकर यांनी यासंदर्भात एक लेटर लिहिले नामदार भारती पवार यांना व सर्व हकीकत त्यांना फोन करून सांगितली.

यात महत्वाची भूमिका बजावली ती भाजप जिल्हा महिला सरचिटणीस सौ.सुवर्णा ताई जगताप यांनी जेव्हा हा विषय सौ. सुवर्णा जगताप यांना समजला तेव्हा त्यांनी वेळेचे गांभीर्य समजून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना व भारती पवार यांना या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी साकडे घातले.

व १२ तारखेला रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सौ सुवर्णा जगताप यांनी ही आनंदाची बातमी यात्रेकरूंना सांगितली.

फक्त नासिक जिल्हाच नाही तर सम्पूर्ण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट रुग्णालयात मेडिकल सुविधा बहाल करण्यात आले व अमरनाथ यात्रेकरूंना या निर्णयामुळे सुटकेचा श्वास सुटलेला दिसून येत होता.परिसरातील अमरनाथ यात्रेकरूकडून डॉ.भारती पवार व सौ.सुवर्णा जगताप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होत असतांना दिसून येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles