♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रमजान ईद लासलगाव येथे उत्साहात साजरी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

महिन्याभराच्या”रोजा”(उपवास)नंतर साजरी होणाऱ्या रमजान ईदची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुस्लीम बांधवांनी काल गुरुवार दि ११ रोजी लासलगाव शहर व परिसरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.

रंगीबेरंगी विविध नक्षिकाम केलेल्या जाळीदार टोप्या नव-नवीन कपडे व अत्तराच्या सुवासाने सुगंधित वातावरण असलेल्या शहरातील ईदगाह मैदानात सकाळी साडे आठ वाजता( ईद -उल -फितर ) ची मुख्य नमाज जामा मशीद चे मौलाना शहर ए इमाम मौलाना सलाउद्दिन साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.

त्याचप्रमाणे नुरानी मशीद मध्ये मौलाना मंजूर अहेमद,रेल्वे स्टेशन येथील गौसीया मशीद मध्ये मौलाना महमूद आलम,टाकळी (विंचूर)मशीद मध्ये मौलाना अख्तर शेख,पिंपळगाव नाजिक रजा नगर येथे हाफिज ताहीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवानी ईद ची नमाज अदा केली.

या वेळी दहा दिवस”एतेकाफ”करणाऱ्यांचा तसेच तीस दिवस उपवास करणाऱ्या सात वर्षीय जैश वसीम शेख व दहा वर्षीय हसनैन वसीम शेख यांच्यासह अन्य दोन छोटे रोजदारांचा सन्मान करण्यात आला.नमाज पठणानंतर येथील लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,पोलीस अधिकारी यांनी मुस्लीम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,प्रभारी सरपंच रामनाथ शेजवळ,जि प सदस्य डी.के.जगताप,स पो नि भास्करराव शिंदे,पो उ नि मारुती सुरासे,ग्रामविकास अधिकारी ज्योतिर्लिंग जंगम,प्रकाश पाटील,संतोष ब्रम्हेचा,गुणवंत होळकर,डॉ.कैलास पाटील,डॉ.अमोल शेजवळ,संतोष पानगव्हाणे,पोलिस हवालदार अरुण डोंगरे,पोलिस नाईक सुजय बारगळ यांनी मौलाना सलाउद्दीन यांचा पुष्पहार व शाल देऊन सन्मान केला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles