♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन दिल्ली व रवी छाया फाउंडेशन, पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने व सौ सुवर्णा जगताप यांच्या सौजन्याने जनसेवेच्या भावनेतून मोफत नेत्र तपासणी शिबीर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

 

शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी लासलगाव येथील गणेश मंदिर येथे व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन दिल्ली व रवी छाया फाउंडेशन, पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने व सौ सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांच्या सौजन्याने जनसेवेच्या भावनेतून मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.


या शिबिरात तज्ञ डॉक्टर द्वारे डोळ्यांची तपासणी विनामूल्य करण्यात आली व चष्म्याची गरज असलेल्या नागरिकांना फक्त रु. 80 /- नाममात्र दरात त्यांच्या आवडी व निवडीनुसार फ्रेम उपलब्ध करून देण्यात आल्या.


या शिबिरास लासलगाव परिसरातील नागरिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे उद्या दिनांक 20 एप्रिल शनिवारी सुद्धा या शिबिराचा लासलगाव व् परिसरातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी लोक आग्रहास्तव आयोजन करण्यात आले आहे .

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा मोफत नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहन सुवर्णाताई जगताप यांनी केले.

या शिबिरासाठी जवळपास २०८ जणांनी हजेरी लावली व त्यापैकी १७८ नागरिकांनी चष्म्याचा लाभ घेतला, यावेळी आलेल्या सर्व नागरिकांना अल्पोपहार देण्यात आला .

या शिबिरासाठी डॉ. शितल शिरसाठ, डॉ., मनोज सोलंकी, संदीप थोरात, दर्शना नाऊकरकर, प्रतीक्षा पाटील, समन्वयक प्रशांत भुसारे, मोबीलायजर विकास कुमार व व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन टीम चे सहकार्य लाभले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी निलेशजी सालकाडे,राजाभाऊ चाफेकर,नलिनी शिंदे मॅडम,निलेश बापू लचके,मनीषभाऊ चोपडा,सुनील भाऊ नेवगे,रूपाताई केदारे,शैलजाताई भावसार,ज्योतीताई शिंदे,भारतीताई महाले,रंजनाताई शिंदे,उषाताई कुमावत,योगिताताई आंबेकर,श्वेताताई लचके,संगीताताई बागुल यांनी प्रयत्न केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles