♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे वॉर्ड क्रमांक ६ येथे अहिल्यादेवी चौकात मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…


जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

 

सोमवार दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी लासलगाव येथील वॉर्ड क्रमांक ६ अहिल्यादेवी चौक येथे व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन दिल्ली व रवी छाया फाउंडेशन, पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने व सौ सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांच्या सौजन्याने जनसेवेच्या भावनेतून मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात तज्ञ डॉक्टर द्वारे डोळ्यांची तपासणी विनामूल्य करण्यात आली व चष्म्याची गरज असलेल्या नागरिकांना फक्त रु. 80 /- नाममात्र दरात त्यांच्या आवडी व निवडीनुसार फ्रेम उपलब्ध करून देण्यात आल्या.

हे शिबिर २३ एप्रिल रोजी पुनः घेण्यात येणार आहे.या परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून आज १६४ नागरिकांनी तपासणी केली असून १०३ नागरिकांनी नंबरचा चष्मा घेतला.

सर्वसामान्य लोकांची गरज लक्षात घेता परिसरात विविध ठिकाणी शिबिर चालू ठेवणार आहे.या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ,मोफत नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहन सुवर्णाताई जगताप यांनी केले.

या शिबिरासाठी डॉ. शितल शिरसाठ, डॉ., मनोज सोलंकी, संदीप थोरात, दर्शना नाऊकरकर, प्रतीक्षा पाटील, समन्वयक प्रशांत भुसारे, मोबीलायजर विकास कुमार व व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन टीम चे सहकार्य लाभले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रभारी सरपंच रामभाऊ शेजवळ ,माजी उपसरपंच ,अनिलजी सोनवणे,गणेशभाऊ निकम,मंडल उपाध्यक्षा नलिनीताई शिंदे मॅडम,अयाज शेख यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास लासलगाव मंडल अध्यक्ष निलेशजी सालकाडे,ग्रामपंचायत सदस्य ज्योतीताई निकम,राजूभाऊ सुरासे,आरतीताई सोनवणे,शैलाताई सोनवणे, सतीश चव्हाण,माधव रायजादे,अर्शद शेख,नसीमा शेख भाबी,इंदुबाई पवार,सोनीताई करडीले उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles