♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांच्याकडून येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची पाहणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरात उभारण्यात येत आहे.

या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित कंत्राटदाराला काम जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे सभापती किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, सचिन कळमकर, सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, गोटू मांजरे, विकी बवाल, सुमित थोरात,मलिक मेंबर, सचिन सोनवणे, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

छगन भुजबळ यांच्याकडून विंचूर चौफुली परिसराची देखील पाहणी करण्यात आली.

येवला शहरातील विंचूर चौफुली येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या ठिकाणी अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विंचूर चौफुली परिसराची पाहणी केली.

यावेळी पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाला येथील अतिक्रमण दूर करून नियमित वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ सिग्नल बसविण्याच्या सूचना केल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles