♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांच्या हस्ते विंचूर येथील जैन स्थानकाचे उद्घाटन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी राजेंद्र देसरडा(जैन)

 

नाशिक,निफाड, विंचूर:-अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. या धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांनी शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला आहे. त्यांच्या या विचाराचा अवलंब केला तर जगभरात शांतता प्रस्थापित होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

विंचूर येथे जैन स्थानकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प.पु.मधुस्मिताजी, प.पु.ज्ञानप्रभाजी, प.पु. भावप्रितीजी, प पू अर्चनाजी, सोहनलाल भंडारी, प्रकाश दायमा, सरपंच सचिन दरेकर, अक्षय सोनी, अमित बोथरा, नितीन जैन, बालचंदजी धोका ,नंदकुमार चोरडिया, कैलास सोनवणे, ज्ञानेश्वर महाराज, सुनील मालपाणी, नीरज भट्टड, कुणाल दराडे,शिवा सुरासे,पांडुरंग राऊत, विलास गोऱ्हे यांच्यासह जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जैन धर्माचे मुख्य प्रार्थना स्थळ म्हणून जैन स्थानकाकडे बघितले जाते. या धार्मिक स्थळातून ऊर्जा घेऊन समाजसेवेचे काम करावे.समकालीन जागतिक परिस्थितीच्या संदर्भात जैन धर्माचे सिद्धांत अतिशय समर्पक आहेत. या जैन धर्माच्या या शिकवणांमुळे आपण समाजात आणि जगात शांतता आणि एकोपा परत आणू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, देशातील संत महंतांनी अनेक महत्वपूर्ण विचार आपल्याला दिले आहे. त्या विचारांची जोपासना करून ते सर्वांनी अंगीकारले पाहिजे. त्यांचे विचार समाजात रुजवून त्यांचा प्रचार प्रसार करायला हवा असे त्यांनी यावेळी सांगितले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles