♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव एसटी बस स्थानकात लालपरिचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

 दिनांक १ जून रोजी लासलगाव बस स्थानकात लाल परीचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

बस स्थानकात मन मोहून घेईल अशी रांगोळी काढून बस स्थानक सजवले होते . ही सर्व सजावट प्रवाश्याचे लक्ष वेधत असल्याचे दिसून आले.

१ जून १९४८ रोजी पहिली लालपरी नगर वरून पूना येथे धावली होती.आज लासलगाव बस स्थानकात लासलगाव तुळजापूर बस ला पुष्पहाराने सजवण्यात आले व लाल परिचि पूजा लासलगाव कृषिउत्पन्न बाजार समिती मा.सभापती सौ.सुवर्णा जगताप व शिवसेना तालुकाप्रमुख मा. सभापती पंचायत समिती निफाड शिवा सुरासे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

केक कापून लालपरिचा ७६ वा वाढदिवस लासलगाव बसस्थानकात साजरा करण्यात आला. यावेळी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सुवर्णा जगताप,शिवा सुरासे व डेपो मॅनेजर सौ. सविता काळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला.

लासलगाव अगारासाठी येणाऱ्या काळात काही नवीन बस ची मागणी डेपो मॅनेजर सौ.काळे यांनी केली असल्याचे सांगितले,बसस्थानकात बंद पडलेली पाणपोई लवकरच चालू करण्यात येईल असे आश्वासन देखील डेपो मॅनेजर सौ.काळे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.


सौ.सुवर्णा जगताप यांनी शिंदे सरकार(भाजप) ने महिलांना दिलेल्या एसटी भाडे मध्ये ५०% सूट दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केले.शिवा सुरासे यांनी लासलगाव बस आगराच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व डेपो मॅनेजर च काम एक महिला आपल्या लासलगाव आगराची धुरा सांभाळत आहेत त्यांच्या कामाचे कौतुक उपस्थित सौ.जगताप,सुरासे व उपस्थित मान्यवरांनी  केले.

प्रत्येक प्रवाश्यांच्या अडचणींना योग्य मार्ग काढणे कोणाशीही वाद न करता संवाद साधणे हे काम ही एक महिला करत आहे याचे कौतुक सौ.सुवर्णा जगताप, शिवा सुरासे व इतर मान्यवरांनी यावेळी केले.

चालक ज्ञानेश्वर रोकडे यांनी बनवलेली एक कविता यावेळी सादर केली याकडे उपस्थित मान्यवर व प्रवाश्याचे लक्ष वेधले गेले

  यावेळी सौ.सुवर्णा जगताप,शिवा सुरासे, डेपो मॅनेजर सौ.सविता काळे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक नितीन बोठे,पोलीस कर्मचारी नाईकवडे,गोपनीय पोलीस कर्मचारी बारगळ,एसटी कर्मचारी,चालक,वाहक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles